Ad will apear here
Next
ह्युवेईची उल्लेखनीय कामगिरी
मुंबई : ह्युवेईने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये लक्षणीय कामगिरी बजावली असून, कंपनीचा विविध देशांमधील बाजारपेठ हिस्सा वाढला आहे. कंपनीचा वार्षिक महसूल २०१६च्या तुलनेत १५.७  टक्क्यांनी वाढून ६०३ बिलियन सीएनवाय पर्यंत पोहोचला आहे.निव्वळ लाभ २८.१ टक्क्याने वाढून, ४७.५ बिलियन सीएनवाय म्हणजेच ७.३ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेला आहे. 

ह्युवेईने २०१७मध्ये एकूण १५ कोटी ३० लाख स्मार्टफोनची विक्री केली. ह्युवेई व ऑनर या दोन्ही ब्रॅंडसनी एकत्र येत नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये व उच्च दर्जाच्या अनुभवावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यापक ग्राहक सेवा आणि स्टायलिश नवीन तंत्रज्ञान यांच्या आधारे तरुण पिढीला आकर्षून घेणारा एकमेव ऑनलाइन मोबाइल ब्रॅंड बनण्याचा प्रयत्न केला आहे. ह्युवेईची ह्युवेई पी व मेट सीरीज जगभरातील ग्राहकांच्या पसंतीची ठरली. त्यांनी एकूण दोन कोटी युनिट्सचा टप्पा पार केला. नोवा सीरीज व ऑनरच्या प्रमुख ड्युअल सीरीजने (व्ही व प्रमुख डिजिटल सीरीज) तंत्रज्ञान व आवाजाच्या संयोजनासह आपली उपस्थिती अधिक प्रबळ केली. उत्तम कामगिरी व वाजवी दर यामुळे  विक्रीला खूपच गती मिळाली. २०१७ मध्ये ह्युवेई व ऑनर स्मार्टफोन्सने जगभरात दहा टक्के बाजारपेठ हिस्सा काबीज केला असून, जगातील अव्वल तीन फोन उत्पादक कंपन्यांमध्ये समावेश झाला आहे. 

ह्युवेई (ऑनरसह)ने चीनमधील स्मार्टफोन बाजारपेठेत सर्वाधिक हिस्सा मिळवला आहे. युरोपमध्ये ह्युवेईला जर्मनी, फिनलँड, डेन्मार्क, स्पेन व इटलीसारख्या देशांमधील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. या देशांमध्ये ह्युवेई हा दुसरा सर्वात प्रशंसनीय ब्रॅंड ठरला. आशिया पॅसिफिकमध्ये ह्युवेईचा जपान, मलेशिया व थायलंड या बाजारपेठांमधील हिस्साही वाढला आहे. जपानसारख्या देशांमध्ये ब्रॅंडला दुप्पट पसंती मिळाली. लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व व आफ्रिकेमध्ये ह्युवेईच्या स्मार्टफोन व्यवसायाने चांगली वाढ नोंदवली, तर युएई, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको व कोलंबिया अशा प्रमुख देशांमध्ये १५ टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळवला आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZVCBO
Similar Posts
अक्षय ऊर्जा निर्मितीत भारताची आघाडी मुंबई : जागतिक पातळीवर अक्षय ऊर्जेच्या निर्मितीमध्ये भारताने आघाडी घेतली असून, २०१८च्या पूर्वार्धात स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील गुंतवणूक गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढली आहे. भारताची प्रगती अशीच कायम राहिल्यास २०२० पर्यंत चीनला मागे टाकून भारत या बाजारपेठेवर आपले वर्चस्व निर्माण करेल. असा
‘एअरटेल’चा ग्राहकांसाठी नवीन उपक्रम मुंबई : भारती एअरटेल (एअरटेल) या भारतातील सर्वांत मोठ्या टेलिकम्युनिकेशन सेवा पुरवठादार कंपनीने अधिकाधिक भारतीय ग्राहकांना डिजिटल महामार्गावर चालणे सोपे जावे यासाठी नवीन उपक्रम सादर केला आहे.
‘एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स’ला ४०६ कोटी नफा मुंबई : एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स लि.ने (एलटीएफएच) आर्थिक वर्ष २०१८ मधील चौथ्या तिमाहीत चारशे सहा कोटींचा एकत्रित करोत्तर नफा मिळवला आहे.
‘शाओमी’तर्फे ‘रेडमी ५’ दाखल मुंबई : ‘शाओमी’ या भारतातील स्मार्टफोन ब्रँडने त्यांच्या ‘रेडमी ५’च्या सर्वस्वी नव्या रूपाची घोषणा करत प्रत्येकाला नवीन अनुभव देऊ करण्याच्या ध्येयाप्रती मोठे पाऊल पुढे टाकले आहे. परवडण्याजोगे मूल्य असलेल्या या स्मार्टफोनने प्रथमच ‘रेडमी ५’प्रमाणे सुलभ असे पूर्ण स्क्रीन इनोव्हेशन फोनमध्ये दिले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language